आगामी कार्यशाळांची माहिती आणि ताज्या अपडेट्ससाठी
आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.
आमच्या कार्यशाळा
AI टूल्स आणि डिजिटल कौशल्य प्रशिक्षण
ही कार्यशाळा तुमच्या व्यवसायासाठी आवश्यक AI टूल्स आणि डिजिटल कौशल्ये शिकवते. तुम्हाला डेटा विश्लेषण, मार्केटिंग ऑटोमेशन, ग्राहक सेवा, आणि कंटेंट मध्ये AI चा वापर कसा करावा हे शिकवले जाते. नवीन तसेच अनुभवी व्यवसायिकांसाठी उपयुक्त.
यशस्वी ऑनलाईन व्यवसायाची Blueprint
या कार्यशाळेत, यशस्वी ऑनलाईन व्यवसाय तयार करण्यासाठी आवश्यक घटकांची माहिती दिली जाते. विषयांमध्ये व्यवसाय योजना, नोंदणी प्रक्रिया, वेबसाइट डिझाईन, डिजिटल मार्केटिंग, SEO, सोशल मीडिया, आणि Sales Funnel ऑप्टिमायझेशन यांचा समावेश आहे.
ब्लॉगिंग आणि मार्केटिंग कार्यशाळा
ही कार्यशाळा ब्लॉग सुरू करण्यासाठी आणि त्याला यशस्वी बनवण्यासाठी आवश्यक टिप्स आणि तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात SEO, लेखन शैली, प्रेक्षकांशी जोडणारे तंत्र, आणि ब्लॉगचे प्रमोशन कसे करावे हे शिकवले जाते. ब्लॉगला अधिक प्रेक्षक मिळवण्यासाठी आणि त्याची पोहोच वाढवण्यासाठी उपयोगी टिप्स दिल्या जातील.
ई-कॉमर्स यशासाठी 360° मार्गदर्शन
ही कार्यशाळा ई-कॉमर्स व्यवसायाची सुरुवात आणि विस्तार करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देते. यामध्ये ऑनलाइन दुकान उभारणे, विक्रीयोग्य उत्पादने निवडणे, योग्य प्लॅटफॉर्म्स वापरणे (Shopify, WooCommerce, Amazon, Flipkart), आणि विक्री वाढवण्यासाठी डिजिटल मार्केटिंग तंत्रांचा वापर यांचा समावेश आहे.
शिक्षक ते उद्योजक कार्यशाळा
ही कार्यशाळा ऑनलाइन शिक्षण व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व मार्गदर्शन प्रदान करते. यात कोर्स डिझाईन करण्याच्या तंत्रांचा अभ्यास, योग्य प्लॅटफॉर्मची निवड, विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रभावी विपणन योजना, आणि व्हर्च्युअल क्लासेस अधिक प्रभावी बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या जातात.
बौद्धिक संपदा (IPR) मास्टरक्लास
ही कार्यशाळा बौद्धिक संपदा कायदे, पेटंट, ट्रेडमार्क, आणि कॉपीराइट याबद्दल सखोल माहिती देते, ज्यामुळे तुमच्या नवकल्पनांना योग्य संरक्षण देणे शक्य होते. तसेच, नवीन कल्पना आणि उत्पादनांची निर्मिती प्रक्रिया, त्यात सामावलेली संशोधन प्रक्रिया, आणि तुमच्या उत्पादनांना बौद्धिक संरक्षण देण्याचे तंत्र समजून दिले जाते.
प्रशिक्षण पद्धती
या कार्यशाळांत विविध प्रकारच्या Learning Tools चा समावेश केला आहे, ज्यामुळे तुम्हाला अधिक सखोल आणि सोयीस्कर शिकण्याचा अनुभव मिळेल.
- Zoom मीटिंग्सद्वारे थेट संवाद: लाइव्ह सेशन्समध्ये प्रशिक्षकांसोबत थेट संवाद साधण्याची संधी, जिथे तुम्हाला तुमचे प्रश्न विचारता येतील आणि मार्गदर्शन मिळेल.
- रेकॉर्डेड सेशन्सची सोय: प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग उपलब्ध केली जाईल, ज्यामुळे तुम्ही वेळ मिळेल तेव्हा पाहून शिकू शकता.
- लर्निंग मटेरियल्स: प्रत्येक कोर्ससाठी अतिरिक्त संदर्भ, नोट्स, आणि अभ्यास साहित्य दिलं जाईल, ज्यामुळे संकल्पना अधिक स्पष्ट होतील.
- स्वयं-अध्ययनासाठी कोर्सेस: हे कोर्सेस तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमच्या गतीने पूर्ण करू शकता, जेणेकरून वेळेची अडचण असल्यासही तुम्ही आपल्या शिकण्याच्या प्रवासाला सुरळीतपणे पुढे नेऊ शकता.
थोडक्यात, अत्यंत क्लिष्ट असं सारं काही, तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकता येईल.